9 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)


9 December 2020 Current Affairs In Marathi

9 December 2020 Current Affairs In Marathi

अनिल सोनी WHO फाऊंडेशनचे सीईओ

चालू घडामोडी (9 डिसेंबर 2020)

भारतीय वंशाचे अनिल सोनी WHO फाऊंडेशनचे पहिले सीईओ :

9 December 2020 Current Affairs In Marathi

 • भारतीय वंशाचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अनिल सोनी यांना जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आलं आहे.
 • आरोग्य विषयक समस्यांना तोंड देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं या जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची निर्मिती केली आहे. अनिल सोनी हे या संघटनेचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत.
 • अनिल सोनी यांच्याकडे 1 जानेवारीपासून मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार दिला जाणार आहे. या दरम्या त्यांची लक्ष्य आरोग्य क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा फायदा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा असणार आहे.
 • जागतिक आरोग्य संघटनेनं करोना महासाथीच्या दरम्यान मे 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची सुरूवात केली होती.
 • तर आतापर्यंत अनिल सोनी हे ग्लोबव हेल्थकेअर कंपनी वियाट्रिस सोबत कार्यरत होते. ते ‘ग्लोबल इन्फेक्शन डिजिज’चे प्रमुख म्हणून वियाट्रिसमध्ये सेवा बजावत होते.
 • तसेच यापूर्वी अनिल सोनी हे क्लिंटन हेल्थ अॅक्सेसमध्येही कार्यरत होते. 2005 ते 2010 या कालावधीत त्यांनी या ठिकाणी सेवा बजावली. याव्यतिरिक्त सोनी यांनी बिल आणि मलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या आरोग्य विभागातही कार्यभार सांभाळला होता. त्यांनी एचआयव्हीच्या उपचारांमध्येही मोलाची भूमिका बजावली आहे.

2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रेकडान्सिंगचे पदार्पण :

9 December 2020 Current Affairs In Marathi

 • ब्रेकडान्सला अधिकृत ऑलिम्पिक क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
 • पॅरिसला 2024 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत ब्रेकडान्सच्या समावेशाचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) घेतला आहे.
 • तर युवा पिढीला ऑलिम्पिकडे मोठय़ा प्रमाणात आकर्षित करण्यासाठी रस्त्यावरील नृत्याला म्हणजेच ‘स्ट्रीट डान्स’ला मान्यता देण्याचा निर्णय ‘आयओसी’ने घेतला आहे. त्यानुसार 2024मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये ब्रेकडान्सिंगचा समावेश असेल.
 • तसेच याआधी टोक्यो ऑलिम्पिकमधून स्केटबोर्डिग, क्लायम्बिंग आणि सर्फिग या खेळांचे पदार्पण होणार होते. मात्र करोनामुळे यावर्षीचा ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षांपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे.
 • यास्थितीत स्केटबोर्डिग, क्लायम्बिंग आणि सर्फिग या तीन्ही खेळांना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान देण्यात आले आहे.

‘माऊंट एव्हरेस्ट’ची नवी उंचीची नेपाळने केली अधिकृत घोषणा :

 • जगातील सर्वात उंच शिखर अशी ओळख असलेल्या माऊंट एव्हरेस्टची नवी उंची मंगळवारी नेपाळकडून जाहीर करण्यात आली.
 • एव्हरेस्टची नवी उंची ही 8,848.86 मीटर असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांनी दिली.
 • तर माऊंट एव्हरेस्टची उंची ही आधीपेक्षा 0.86 सेंटीमीटर एवढी वाढली असल्याचीही माहिती ग्यावली यांनी दिली.
 • जवळपास वर्षभर या शिखराची उंचीच्या मोजमापावर काम सुरू होते. त्यानंतर अखेर मंगळवारी नेपाळकडून एव्हरेस्टची नवी उंची अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.
 • तसेच 2015 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामध्ये एव्हरेस्टचा काही भाग खचला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानंतर नेपाळ सरकारने ही उंची पुन्हा एकदा मोजण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागेल असं स्पष्ट केलं होतं.
 • भूकंपानंतर हे शिखर काहीसं खचलं असल्याची शक्यता असल्याने पुनर्मोजणीचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.

फायझर लशीमुळे 10 दिवसांत संरक्षण :

 • कोविड-19 विषाणूवरील फायझर व बायोएनटेक यांची लस पहिल्याच मात्रेत दहा दिवसांत विषाणूपासून रुग्णाला उत्तम संरक्षण देते, असे दिसून आले आहे.
 • तर अमेरिकी अन्न व औषध प्रशासनापुढे या लशीच्या चाचण्यांबाबतची जी कागदपत्रे मांडण्यात आली त्यातून हे स्पष्ट झाले आहे.
 • अमेरिकेतील लस सल्लागार गटाची जी बैठक झाली, त्यात लशीबाबत अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाली. या बैठकीत ज्या माहिती अहवालांचे सादरीकरण झाले त्यात 53 पानांच्या मूळ माहिती विश्लेषण पुस्तिकेचा समावेश आले.
 • तसेच गेल्या महिन्यात ही लस दोन मात्रा दिल्यानंतर 95 टक्के प्रभावी ठरली होती. ती 21 दिवसांच्या अंतराने देण्यात आली. गेल्या महिन्यात बायोएनटेक व फायझर यांनी लशीच्या दोन मात्रानंतर 95 टक्के प्रभावाचा दावा केला असून प्रत्यक्षात फायझरची लस फार लवकर करोनाविरोधात काम करू लागते.
 • वय, वंश, वजन यापैकी कुठल्याही घटकाचा विचार केला, तरी ही लस जास्त चांगली व वेगाने विषाणूचा प्रतिबंध करणारी असल्याचे दिसून आले आहे. या लशीचे कुठलेही गंभीर गैरपरिणाम दिसून आलेले नाहीत.

दिनविशेष :

 • 9 डिसेंबरआंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन
 • 9 डिसेंबर 1892 मध्ये इंग्लिश फुटबॉल क्लब न्यूकॅसल युनायटेडची स्थापना झाली
 • डेव्हीस कप टेनिस स्पर्धेची 9 डिसेंबर 1900 मध्ये सुरवात.
 • 9 डिसेंबर 1946 मध्ये दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.
 • ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया देशाचा जन्म 9 डिसेंबर 1961 मध्ये झाला.

 


Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *