6 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)


6 November 2020 Current Affairs In Marathi

6 November 2020 Current Affairs In Marathi
26 October 2020 Current Affairs In Marathi
मारुती चितमपल्ली यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार

चालू घडामोडी (6 नोव्हेंबर 2020)

चीनचा मोठा निर्णय, भारतातून येणाऱ्या परदेशी नागरिकांना प्रवेशबंदी :

 • चीनने भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना देशात प्रवेशबंदी केली आहे. चीनी व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या भारतातील सर्व परदेशी नागरिकांना हा निर्णय लागू असणार आहे.
 • तर इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपासाठी असून करोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.
 • याशिवाय चीनने भारतातून येणाऱ्या सर्व विमानांच्या उड्डाणावरही स्थगिती आणली आहे.
 • चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून यासंबंधी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यानुसार, भारतात असणाऱ्या चिनी दुतावासाकडून व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळणार नाही.
 • तसेच आपातकालीन परिस्थिती किंवा माणुसकीच्या आधारे चीनमध्ये प्रवेश मिळू इच्छिणारे चिनी दुतावासात व्हिसासाठी अर्ज करु शकतात. 3 नोव्हेंबर नंतर व्हिसा दिलेल्यांना कोणताही अडथळा येणार नाही.
 • हा निर्णय फक्त भारतापुरता मर्यादित नसून याआधी इतर देशांसंबंधीही असा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचे रुग्ण वाढत असल्याने उपाययोजना म्हणून चीन पावलं उचलत आहे.
 • भारताशिवाय ब्रिटेन, बेल्जिअम आणि फिलिपाइन्समधून नागरिकांनाही चीनमध्ये प्रवेशबंदी आहे. याशिवाय फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेतील नागरिकांना प्रवेश करण्याआधी वैद्यकीय तपासणी अहवाल सादर करण्याचा आदेश आहे.

पर्यायी ऊर्जेचा वाटा 40 टक्के करण्याचे लक्ष्य :

 • पॅरिस करारानुसार 2100 पर्यंत तापमानातील वाढ दोन अंश सेल्सिअसपर्यंत सीमित राखण्यासाठी देशाने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात धोरणात्मक निर्णय घेतले असून कार्बन उत्सर्जनदेखील 35 टक्क्यांनी कमी केले जाईल, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी ‘इंडिया सीईओ फोरम’च्या पर्यावरण बदलासंदर्भातील कार्यक्रमात दिली.
 • तर जगभरातील विविध देशांनी एकत्रितपणे पर्यावरणातील बदलांची गती कमी करण्यासाठी ‘पॅरिस करार’ केला आहे.
 • त्याअंतर्गत तापमानातील वाढ दोन अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होऊ नये, हा प्रमुख उद्देश ठेवण्यात आला आहे.
  तसेच अमेरिकेने मात्र या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

मारुती चितमपल्ली यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार :

 • महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला.
 • तर इतर पुरस्कारांमध्ये पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार तांदलवाडी जि. जळगाव येथील उदय सुभाष चौधरी यांना तर पक्षी संशोधन पुरस्कार डॉ. अमोल सुरेश रावणकर, अचलपूर व किरण मोरे, अमरावतीयांना विभागून देण्यात आला आहे. पक्षी जनजागृती पुरस्कार नाशिक येथील सतीश गोगटे यांना जाहीर करण्यात आला आहे.
 • तसेच महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे 2019 पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली.
 • यंदाच्या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे. यावर्षी 34 वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे 2021 मध्ये आहे. या पुरस्कारांचे वितरण या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात केले जाणार आहे.

ऑनलाइन वर्गाला फक्त पाच दिवस दिवाळीची सुट्टी :

 • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. उन्हाळी व गणेशोत्सवाच्या सुट्टीतही ते सुरू होते. त्यामुळे दिवाळीमध्ये मोठी सुट्टी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.
 • मात्र राज्य सरकारने 12 ते 16 नोव्हेंबर अशी फक्त पाच दिवसच ऑनलाईन वर्गाला सुट्टी जाहीर केली. .
 • तसेच शाळांना पूर्वी दिवाळीची सुट्टी 21 दिवस होती. त्यांनतर वार्षिक सुट्ट्या 80 ऐवजी 76 करण्यात आल्याने दिवाळी सुट्टी 18 दिवस केली. पण कोरोनामुळे अभ्यास उशिरा सुरू झाल्याने दिवाळी सुट्टीसंदर्भात काढलेल्या परिपत्रकात ही सुट्टी फक्त पाच दिवसांची केली.

दिनविशेष :

 • सन 1860 मध्ये 6 नोव्हेंबर रोजी अब्राहम लिंकन अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
 • दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना 6 नोव्हेंबर 1913 रोजी अटक झाली होती.
 • 1888 मध्ये महात्मा गांधींनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन येथे प्रवेश घेतला.
 • भारत या पत्राचा पहिला अंक 1912 मध्ये प्रसिद्ध झाला.

 


Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *