30 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)


30 October 2020 Current Affairs In Marathi

30 October 2020 Current Affairs In Marathi
26 October 2020 Current Affairs In Marathi
देशातील 736 धरणांची सुरक्षा:

चालू घडामोडी (30 ऑक्टोबर 2020)

देशातील 736 धरणांची सुरक्षा:

 • देशातील 736 धरणांची सुरक्षा आणि त्यांच्या देखभालीसाठी 10,211 कोटींच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली.
 • एप्रिल 2021 ते मार्च 2031 या दहा वर्षांमध्ये ही योजना दोन टप्प्यांमध्ये राबवण्यात येईल.
 • या योजनेसाठी जागतिक बँक व आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक (एआयआयबी) 7 हजार कोटींचे कर्ज देणार आहे.
 • देशातील या योजनेतील 736 धरणांपैकी महाराष्ट्रातील 167, राजस्थानातील 189 आणि तमिळनाडूतील 59 धरणांचा समावेश आहे.
 • अमेरिका आणि चीननंतर सर्वाधिक मोठी धरणे भारतात आहेत. देशात 5334 मोठी व मध्यम धरणे आहेत.
 • शिवाय, 411 धरणे बांधण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही धरणे शंभर वर्षे जुनी आहेत. 80 टक्के धरणे 25 वर्षे जुनी आहेत.
 • एकूण धरणांपैकी 736 धरणांची डागडुजी, सुधारणा व क्षमतावाढ करण्याची गरज आहे. या योजनेत या धरणांची
 • शास्त्रीयदृष्टय़ा देखभाल केली जाईल, अशी माहिती जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिली.

लष्कराने स्वत:च सुरक्षित मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित केलं साई असे नाव दिले:

 • परस्परांशी चॅट करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांना आता अन्य बाहेरच्या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
 • लष्कराने स्वत:च सुरक्षित मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित केलं आहे. त्यावरुन ते परस्परांशी चॅट करु शकतात.
 • त्याला ‘सेक्युर अ‍ॅप्लिकेशन फॉर इंटरनेट’ (साई) असे नाव दिल्याचे लष्कराकडून गुरुवारी सांगण्यात आले.
 • व्हॉटसअ‍ॅप, टेलिग्राम, जीआयएमएस सारख्या व्यावसायिक मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन सारखेच हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन आहे.
 • अ‍ॅड्रॉइड प्लॅटफॉर्मवरुन इंटरनेटद्वारे टेक्सट आणि व्हिडीओ कॉलिंग करता येईल. इन हाऊस सर्व्हरसह कोडिंगची सुरक्षेचे सर्व फिचर या साई अ‍ॅपमध्ये आहेत”

बार्सिलोनाच्या विजयात मेसीचे योगदान:

 • बार्सिलोनाने यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम फुटबॉल खेळ करत चॅम्पियन्स लीगमध्ये युव्हेंटसला 2-0 असे पराभूत केले.
 • मेसीने पेनल्टीवर केलेला गोल बार्सिलोनाच्या विजयात मोलाचा ठरला.
 • मेसीने नेहमीप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी केली. याउलट रोनाल्डोच्या जागी युव्हेंटस संघात निवड झालेल्या इवारो मोराटाचे तीन गोल ऑफसाइड असल्याने रद्द करण्यात आले.
 • याउलट बार्सिलोनाने 14व्या मिनिटालाच ओस्माने डेम्बलेच्या गोलवर 1-0 आघाडी घेतली होती.

दिनविशेष:

 • 30 ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन‘ आहे.
 • भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 मध्ये झाला.
 • सन 1920 मध्ये सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना करण्यात आली.
 • सन 1945 मध्ये भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.
 • शिवाजी पार्कवर सन 1966 मध्ये शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.

 


Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *