27 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)


27 October 2020 Current Affairs In Marathi
27 October 2020 Current Affairs In Marathi

 

चंद्रावर पाणी सापडल्याचा NASAचा दावा

चालू घडामोडी (27 ऑक्टोबर 2020)

चंद्रावर पाणी सापडल्याचा NASAचा दावा :

27 October 2020 Current Affairs In Marathi

 • चंद्रावर पाणी सापडल्याचा दावा NASA ने केला आहे. चंद्रावर पाणी सापडलं आहे नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे आम्ही ते पहिल्यांदाच शोधलं आहे असंही नासाने म्हटलं आहे.
 • अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने सोमवारी आपल्या नव्या शोधाबाबत माहिती दिली आहे. एवढंच नाही तर आता नासाने दोन अंतराळवीरांनाही 2024 पर्यंत चंद्र मोहिमेवर पाठवण्याचाही निर्णय घेतला आहे.
 • तसेच जे दोन अंतराळवीर चंद्रावर जातील त्यापैकी एक पुरुष आणि एक महिला अंतराळवीर असेल असंही नासाने सांगितलं आहे. चंद्रावर पाणी सापडल्याच्या शोधाने आता नासाच्या चांद्रयान मोहिमेला बळ मिळालं आहे.
 • चंद्राच्या सूर्यप्रकाशित भागातही पाणी असल्याचा शोध सोफिया या हवाई वेधशाळेने लावला आहे. चंद्राच्या फक्त ध्रुवीय आणि अंधाऱ्या प्रदेशापुरते पाण्याचे अस्तित्व मर्यादित नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर सर्वत्र पाण्याचे अंश असल्याचे या शोधातून सुचित करण्यात आले आहे.

रिगोचेस बुद्धिबळ महोत्सवत लेऑन मेंडोसाला विजेतेपद :

27 October 2020 Current Affairs In Marathi

 • भारताचा युवा आंतरराष्ट्रीय मास्टर लेऑन ल्युक मेंडोसा याने हंगेरी येथील रिगोचेस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवाचे विजेतेपद मिळवले. या कामगिरीसह ग्रँडमास्टर किताब मिळवण्याच्या दिशेने त्याने पहिला टप्पा पार केला.
 • तर 14 वर्षीय मेंडोसाने सहा डाव जिंकत, दोन बरोबरी आणि एका पराभवासह नऊ फेऱ्यांमध्ये सात गुण मिळवून जेतेपद मिळवले. या स्पर्धेत तीन ग्रँडमास्टरसह 10 बुद्धिबळपटू सहभागी झाले होते.
 • गोव्याच्या मेंडोसा (एलो 2499 रेटिंग गुण) याने विलियम पाश्चलविरुद्धचा पहिला डाव जिंकल्यानंतर त्याला अ‍ॅलेक्स क्रूटूलोव्हिककडून पराभूत व्हावे लागले. तिसरा डाव बरोबरीत सोडवल्यानंतर त्याने सलग पाच डाव जिंकत अग्रस्थान पटकावले. त्याने गुयेन हून मिन्ह हाय आणि डेव्हिड बेरके झ या दोन ग्रँडमास्टर्सवर मात केली.

‘ऑक्सफर्ड’ची लस परिणामकारक :

27 October 2020 Current Affairs In Marathi

 • ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाची करोना प्रतिबंधक लस तरुण आणि ज्येष्ठांमध्ये करोनाविरोधी प्रतिकारशक्ती तयार करण्यात यशस्वी ठरली आहे.
 • तर या आधी जुलैमध्ये ही लस 18 ते 55 वयोगटातील व्यक्तींमध्ये प्रभावी ठरत असल्याचे चाचण्यांत सिद्ध झाले होते. आता त्यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे.
 • ‘ऑक्सफर्ड’ची करोना प्रतिबंधक लस लवकर बाजारात येऊन आर्थिक आणि आरोग्य क्षेत्रातील मळभ दूर होण्याची आशा वाढली आहे. ऑक्सफर्ड लशीची निर्मिती अ‍ॅस्ट्राझेन्का ही कंपनी करणार आहे.
 • अ‍ॅस्ट्राझेन्का कंपनीने म्हटले आहे, की प्रतिकारशक्तीतील वाढ तरुण व ज्येष्ठांमध्ये सारखीच असून ज्येष्ठांमध्ये लशीचे काही किरकोळ दुष्परिणाम दिसण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे ही लस सर्व वयोगटांसाठी सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. ‘एझेडडी 1222’ ही लस सुरक्षित असल्याचे हे पुरावे अलीकडेच हाती आल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

दिनविशेष:

 • 27 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक ऑडिओव्हिज्युअल वारसा दिन‘ आहे.
 • स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक जतिंद्रनाथ तथा जतिन दास यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1904 मध्ये झाला.
 • भारताचे 10वे राष्ट्रपती के.आर. नारायणन यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1920 मध्ये झाला.
 • सन 1961 मध्ये मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) मध्ये प्रवेश झाला.
 • डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे सन 1971 मध्ये नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.

 


Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *