18 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs
योगी आदित्यनाथ

चालू घडामोडी (18 ऑगस्ट 2021)

अफगाणी नागरिकांसाठी भारताचा आपत्कालीन इ-व्हिसा :

 • अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हस्तगत केल्याच्या पार्श्वभूमीवर जे अफगाणी नागरिक भारतात येऊ इच्छित असतील त्यांना आपत्कालीन इ-व्हिसा जारी करण्याचे भारताने मंगळवारी जाहीर केले आहे.
 • अफगाणिस्तानचे कुठल्याही धर्माचे नागरिक इ आपत्कालीन व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्या अर्जांवर नवी दिल्ली येथे प्रक्रिया केली जाईल.
 • तर तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर दोन दिवसांनी भारताने ही घोषणा केली आहे.
 • तसेच हा व्हिसा सुरुवातीला सहा महिन्यांसाठी असणार आहे. सुरक्षा बाबींचा विचार अर्ज मंजूर करताना केला जाणार आहे, त्यानंतरच अफगाणी नागरिकांना प्रवेश दिला जाईल.

योगी आदित्यनाथ यांनी राज्यासाठी नव्या लोकसंख्या धोरणाची घोषणा :

 • गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यासाठी नव्या लोकसंख्या धोरणाची घोषणा केली होती.
 • तर यानुसार राज्यात दोन अपत्यांचा नियम अंमलात आणण्याचं जाहीर करण्यात आलं होतं.
 • तसेच या कायद्याचा मसुजा खुल्या व्यासपीठावर ठेऊन त्यावर जनतेची मतं आणि सुधारणा मागवण्यात आल्या होत्या.
 • त्यानुसार आता उत्तर प्रदेशच्या कायदा आयोगाने या सुधारणांचा विचार करून उत्तर प्रदेश लोकसंख्या (नियंत्रण, स्थिरता आणि कल्याण) विधेयकाचा मसुदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
 • मसुद्यामधील इतर सर्व तरतुदींमध्ये कुटुंब नियोजनाला प्राधान्य देण्यात आलं आहे.
 • प्रस्तावित विधेयकामध्ये राज्याचा साधारण जन्मदर कमी करण्याचं धोरण निश्चित करण्यात आलं आहे.
 • यासाठी दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या दाम्पत्याला मिळणाऱ्या सवलतींमध्ये घट करणे आणि दोनपेक्षा जास्त अपत्य न होऊ देण्याचा निर्णय घेणाऱ्या दाम्पत्यांना अधिक सवलती देणं असे उपाय केले जाणार आहेत.

लसींचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सिरमचा मोठा निर्णय :

 • भारतात सर्वाधिक लसींचा पुरवठा करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटनं लसींचा हाच पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
 • देशातील आघाडीच्या शॉट कायशा या कंपनीची 50 टक्के मालकी अर्थात 50 टक्के शेअर्स सिरम इन्स्टिट्युटनं खरेदी केले आहेत.

भारत-पाकिस्तान सलामी 24 ऑक्टोबरला :

 • ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची सलामीची लढत दुबईमध्ये 24 ऑक्टोबरला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी जाहीर केले.
 • ‘आयसीसी’ने जाहीर केलेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या वेळापत्रकानुसार भारताची दुसरी लढत 31 ऑक्टोबरला दुबईतच न्यूझीलंडशी होणार आहे, तर 3 नोव्हेंबरला अबू धाबी येथे अफगाणिस्तानशी पुढील सामना होईल.
 • भारताचे ‘अव्वल-12’ संघांमधील उर्वरित दोन सामन्यांचे प्रतिस्पर्धी मात्र साखळीच्या पहिल्या फेरीनंतर निश्चित होतील.
 • भारत ब-गटातील विजेत्याची 5 नोव्हेंबरला, तर अ-गटातील विजेत्याशी 8 नोव्हेंबरला सामना करणार आहे.

दिनविशेष:

 • मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 मध्ये झाला.
 • सन 1824 मध्ये जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली.
 • उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे सन 1942 मध्ये तिरंगा फडकावला.
 • राजदूत, मुत्सद्दी राजकारणी ‘विजयालक्ष्मी पंडीत‘ यांचा जन्म 18 ऑगस्ट 1900 मध्ये झाला.


Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *