16 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)


16 November 2020 Current Affairs In Marathi

16 November 2020 Current Affairs In Marathi

आरसेप व्यापार करारावर 15 प्रमुख देशांच्या स्वाक्षऱ्या

चालू घडामोडी (16 नोव्हेंबर 2020)

आरसेप व्यापार करारावर 15 प्रमुख देशांच्या स्वाक्षऱ्या :

16 November 2020 Current Affairs In Marathi

 • ‘आरसेप’ म्हणजे प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागीदारी (रिजनल कॉम्प्रेहेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप) करारावर आशिया—पॅसिफिकमधील चीनसह पंधरा प्रमुख देशांनी स्वाक्षरी केली आहे.
 • तर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार मानला जात आहे. ‘आसियान’ (‘असोसिएशन ऑफ साउथ इस्ट एशियन नेशन्स’) देशांच्या वार्षिक परिषदेच्यावेळी रविवारी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 • करोनामुळे बिघडलेली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी या देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून भारत व अमेरिका मात्र त्यापासून दूर राहिले आहेत.
 • जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नात या देशांचा वाटा 30 टक्के आहे. 2012 मध्ये आरसेप कराराची संकल्पना मांडली गेली होती. या करारावर आग्नेय आशिया शिखर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले असून त्यामुळे करोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थांना सावरण्याची संधी मिळणार आहे.

कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना :

16 November 2020 Current Affairs In Marathi

 • कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी यासंबंधी आदेश दिला आहे.
 • मराठा विकास प्राधिकरणासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली असून निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
 • तसेच कर्नाटक राज्यात तसंच खासकरुन सीमारेषेवरील परिसरात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजातील नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • तर अधिकृत आदेशानुसार, गेल्या कित्येक दशकांपासून कर्नाटक राज्यात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजाच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • मराठा विकास प्राधिकरणाचं मुख्य लक्ष्य समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक विकासाकडे असणार आहे.

प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचे निधन :

16 November 2020 Current Affairs In Marathi
 • प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी याचे निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते.
 • सौमित्र चटर्जी हे बंगाली कलाविश्वातील एक नावाजलेलं नाव होतं. त्यांनी 1959 मध्ये अपुर संसार या चित्रपटाच्या माध्यमातून करिअरची सुरुवात केली.
 • तर प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्यासोबत त्यांनी जवळपास 14 चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
 • विशेष म्हणजे फ्रान्समधील सर्वात मानाचा Ordre des Arts et des Lettres या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचसोबत त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेदेखील गौरविण्यात आलं होतं. इतकंच नाही तर 3 वेळा त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार , 7 फिल्मफेअर व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

हॅमिल्टनला सातवे जगज्जेतेपद :

 • मर्सिडीझच्या लुइस हॅमिल्टनने रविवारी ओलसर अशा ट्रॅकवर निर्विवाद वर्चस्व गाजवत तुर्कीश ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यतीचे जेतेपद पटकावले आणि सातव्यांदा जगज्जेता होण्याचा मान मिळवला. या कामगिरीसह त्याने मायकेल शूमाकर याच्या सात जगज्जेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
 • तर या मोसमातील 10वी शर्यत जिंकत हॅमिल्टनने कारकीर्दीत 94 जेतेपदे पटकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.
 • 2013 मध्ये मर्सिडीझ संघातील शूमाकरची जागा घेतल्यानंतर हॅमिल्टनने सहा जगज्जेतेपदे मिळवली आहेत. मॅकलॅरेनकडून खेळताना त्याने 2008 मध्ये जगज्जेतेपद पटकावले होते.

नितीशकुमारच मुख्यमंत्रिपदी :

 • बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हेच असतील, यावर रविवारी झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले.
 • तर आज नितीशकुमार चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. मात्र, उपमुख्यमंत्रिपद कोणाकडे सोपविले जाईल,
 • याबाबत उत्सुकता असून तारकिशोर प्रसाद आणि रेणुदेवी यांची नावे या पदासाठी आघाडीवर आहेत. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी तारकिशोरप्रसाद सिंह यांची निवड करण्यात आली आहे.
 • नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 125 जागांवर विजय मिळाला. रालोआला निसटते बहुमत मिळाले असले तरी नितीशकुमार यांच्या जदयुला अवघ्या 43 जागांवर समाधान मानावे लागले.

दिनविशेष:

16 November 2020 Current Affairs In Marathi

 • 16 नोव्हेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन‘ म्हणून पाळला जातो.
 • सन 1893 मध्ये डॉ. अ‍ॅनी बेझंट यांचे भारतात आगमन झाले होते.
 • केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी ‘धोंडो वासुदेव गद्रे‘ यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1894 मध्ये झाला.
 • सन 1945 मध्ये युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.
 • 16 नोव्हेंबर 1996 रोजी कोकण रेल्वेच्या रत्‍नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ झाला.
 • सन 1997 मध्ये अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *