15 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairsचालू घडामोडी (15 डिसेंबर 2020)

1 जानेवारीपासून Cheque पेमेंटचा नियम बदलणार :

 • नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जानेवारीपासून बँकिंग सिस्टममध्ये काही बदल होणार आहेत. चेक पेमेंट (Cheque Payment) करण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहे.
 • भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) याबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. त्यानुसार, लोकांना 50 हजार रुपयांहून अधिकच्या रकमेवर जारी करण्यात आलेल्या नियमांचं पालन करावं असणार आहे.
 • भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2021 पासून पॉझिटिव्ह पे सिस्टम (Positive Pay System) लागू होणार आहे.
 • तर या सिस्टममध्ये 50 हजारांहून अधिकच्या पेमेंटसाठी दुसऱ्यांदा रि-कन्फर्म करावं लागेल. या सिस्टमअंतर्गत एसएमएस, मोबाईल अ‍ॅप, इंटरनेट बँकिंग आणि एटीएमद्वारे चेक लिहिण्याचा तपशील बँकेत जारी करावा लागेल.
 • तर याच्या माध्यमातून चेकची तारीख, पेमेंट करणाऱ्या व्यक्तीचं नाव, पेयी अर्थात रक्कम घेणाऱ्या व्यक्तीचं नाव, रकमेचे डिटेल्स द्यावे लागतील.

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन :

 • चित्त्याची चपळाई, आक्रमक कुस्तीच्या जोरावर उत्तरेतील प्रसिद्ध मल्ल रुस्तम-ए-पंजाब बत्तासिंग याला चितपट करून भारताचे पहिले हिंदकेसरी बनलेले श्रीपती शंकर खंचनाळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
 • तर ‘सारे जीवन लाल मातीतील कुस्तीला वाहून घेतलेला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर धडक दिलेला नामांकित मल्ल’ अशी खंचनाळे यांची ओळख होती.
 • तसेच नवी दिल्लीत 3 मे 1959 ला झालेल्या लढतीत बत्तासिंगला चितपट करून ते हिंदकेसरी झाले होते.
 • महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार, तर कर्नाटक शासनाच्या ‘कर्नाटक भूषण’पुरस्काराने त्यांचा गौरव झाला होता.

दुबई आयटीएफ टेनिस स्पर्धात अंकिताला दुहेरीचे विजेतेपद :

 • भारताची अव्वल टेनिसपटू अंकिता रैनाने दुबई येथील अल हबतूर चॅलेंज या ‘आयटीएफ’ प्रकारातील दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
 • अंकिताने चालू वर्षांत पटकावलेले हे दुहेरीतील तिसरे विजेतेपद ठरले.
 • अंकिताने जॉर्जियाच्या इकॅटरिन जॉजरेझेच्या साथीने खेळताना स्पेनची अ‍ॅलिओना झॅडोइनोव आणि स्लोव्हाकियाची काजा जुवान या जोडीचा 6-4, 3-6, 10-6 असा पराभव केला.
 • अंकिताची या हंगामात दुहेरीची अंतिम फेरी गाठण्याची ही चौथी वेळ ठरली. मात्र तिचे हे या हंगामातील सर्वोच्च विजेतेपद हे दुबईमधील ठरले.

लसीकरण आराखडा तयार :

 • केंद्र सरकारने करोना लसीकरण मोहिमेसाठी राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. प्रत्येक दिवशी एका सत्रात 100 ते 200 लोकांचे लसीकरण, लस दिल्यानंतर प्रतिकूल परिणाम पाहण्यासाठी 30 मिनिटे देखरेख आणि एका वेळी एकाच व्यक्तीला लस, अशा प्रमुख मार्गदर्शक सूचनांचा त्यांत समावेश आहे.
 • लसीकरणाच्या ठिकाणी केवळ नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचे प्राधान्यक्रमानुसार लसीकरण केले जाईल आणि लसीकरणस्थळी नोंदणी करण्याची कुठलीही तरतूद असणार नाही, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
 • नोंदणी केलेल्या लाभार्थीच्या लसीकरणासाठी ‘कोविड व्हॅक्सिन इन्टेलिजन्स नेटवर्क (को-विन)’ या डिजिटल यंत्रणेचा वापर करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात सुमारे 30 कोटी लोकांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.
 • लसवाहक, लसीच्या कुप्या वा शीतपेटय़ा यांचा सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, असे ‘करोना लसीकरण मोहीम मार्गदर्शक तत्त्वां’मध्ये नमूद करण्यात आले आहे.

दिनविशेष:

 • 15 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय चहा दिन‘ आहे.
 • नागपूरकर भोसलेंनी सन 1803 मध्ये ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला होता.
 • स्वामी स्वरुपानंद यांचा जन्म 15 डिसेंबर 1903 मध्ये झाला.
 • सन 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला.
 • चित्रपट दिगदर्शक सत्यजित रे यांना सन 1991 मध्ये ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले होते.Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *