13 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)


13 December 2020 Current Affairs In Marathi

13 December 2020 Current Affairs In Marathi
13 December 2020 Current Affairs In Marathi
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

चालू घडामोडी (13 डिसेंबर 2020)

डिजिटल मतदार ओळखपत्रांचा प्रस्ताव :

13 December 2020 Current Affairs In Marathi

 • निवडणूक आयोग मतदारांना डिजिटल पद्धतीची ओळखपत्रे जारी करण्याबाबत विचार करीत असून ही मतदार ओळखपत्रे डिजिटल रूपात असल्यास ती चटकन वापरता येऊ शकतात. असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.
 • डिजिटल मतदान ओळखपत्र मतदार मोबाइलमध्ये बाळगू शकतात काय या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की एकदा निवडणूक आयोगाने डिजिटल मतदार ओळखपत्रांचा निर्णय घेतल्यानंतर ती पुढची पायरी असू शकते.
 • तसेच हे ओळखपत्र मोबाइलवर , संकेतस्थळावर, ई-मेलरूपात ठेवता येणारे किंवा मुद्रित स्वरूपात मतदानावेळी स्वतजवळ बाळगता येणारे अशा कुठल्याही प्रकारात आणता येईल.
 • डिजिटल स्वरूपात व्यक्तीचे छायाचित्रही स्पष्ट असेल. अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे, की तंत्रज्ञानाचा गैरवापर टाळण्यासाठी हा निर्णय घेताना सुरक्षेचा विचार करावा लागेल.

केरळमधील नागरिकांना करोना लस मिळणार मोफत :

 • केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी करोना लशीसंदर्भात एक मोठी घोषणा केली.
 • केरळमध्ये करोनावरील लस मोफत दिली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे.
 • केरळ आता तिसरे राज्य ठरले आहे, जिथे करोना लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
 • तर या अगोदर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी ऑक्टोबर महिन्यात घोषणा केली होती की, एकदा करोनावरील लस आली की ती राज्यातील नागरिकांना मोफत दिली जाईल.
 • यानंतर मध्यप्रदेशकडून देखील ऑक्टोबरच्या शेवटी अशाचप्रकारची घोषणा केली गेली.

डॉक्टरांना दहा वर्ष द्यावी लागणार शासकीय रुग्णालयात सेवा :

13 December 2020 Current Affairs In Marathi

 • उत्तर प्रदेशात शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्या कमी असून, डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
 • वैद्यकीय पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणं अनिवार्य असतं.
 • तर उत्तर प्रदेश सरकारने डॉक्टरकीची पदवी घेतल्यानंतर 10 वर्षे शासकीय रुग्णालयात काम करणं सक्तीचं केलं आहे. जर मध्येच सेवा सोडली, तर डॉक्टरांना 1 कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे.
 • उत्तर प्रदेशात सध्या वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रामीण एक वर्ष नोकरी केल्यास 10 अंकांची सूट दिली जाते.
 • तर दोन वर्ष सेवा केल्यास 20 अंकांची सूट देण्यात येते. त्याचबरोबर डॉक्टर पदव्युत्तर अभ्यासक्रमाबरोबरच इतर प्रमाणपत्र अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेऊ शकतात.

दिनविशेष:

13 December 2020 Current Affairs In Marathi
 • भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक ‘संजय लोळ‘ यांचा जन्म 13 डिसेंबर 1940 मध्ये झाला होता.
 • गोव्याचे मुख्यमंत्री ‘मनोहर पर्रीकर‘ यांचा जन्म 13 डिसेंबर 1955 मध्ये झाला.
 • सन 1991 मध्ये मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे 23वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला होता.
 • सायरस मिस्त्री यांना 2016 मध्ये टी.सी.एस. च्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष पदावरून काढण्यात आले.
 • अँडी मरे आणि अँजेलीक्यू केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) ने 2016 जागतिक विजेते घोषित केले.

 


Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *