चालू घडामोडी (12 नोव्हेंबर 2020)
‘स्पुटनिक व्ही’ लसही परिणामकारक :
- कोविड-19 ला प्रतिबंध करण्यात रशियाची स्पुटनिक व्ही लस 92 टक्के परिणामकारक ठरली असल्याचे देशाच्या आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेल्या चाचणीच्या अंतरिम निष्कर्षांत म्हटले आहे.
- तर ही लस करोनाच्या प्रतिबंधासाठी 90 टक्के परिणामकारक असल्याचे, लस तयार करणाऱ्या फायझर आणि बायोनटेक या कंपन्यांनी या आठवडय़ाच्या सुरुवातीला सांगितल्यानंतर सरकारने ही घोषणा केली आहे.
- तसेच करोनाचा संसर्ग झालेल्या 20 जणांपैकी काही जणांना ही लस देण्यात आली, तर काहींना ‘प्लासिबो’ देण्यात आला. या चाचणीवर लशीच्या परिणामकारकतेचा अंदाज आधारित आहे, असे रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांनी सांगितले.
- गामालय सेंटरने विकसित केलेल्या या लशीची परिणामकारकता, ती पहिल्यांदा टोचण्यात आल्याच्या 21 दिवसांनंतरच्या पहिल्या अंतरिम विश्लेषणावर आधारित आहे. लशीच्या चाचणीदरम्यान कुठलेही अनपेक्षित असे विपरीत परिणाम दिसून आले नाहीत. ज्यांच्यावर लशीची चाचणी करण्यात आली, त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येत आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
टेलिकॉमनंतर रिटेल क्षेत्रात धमाका करणार मुकेश अंबानी :
12 November 2020 Current Affairs In Marathi
- भारतीय टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओच्या पदार्पणामुळे प्रचंड उलथापालथ झाली. स्वस्त डेटा आणि कॉलिंग प्लॅन्सच्या सहाय्याने खळबळ उडवून देणाऱे मुकेश अंबानी आता ऑनलाइन रिटेल क्षेत्रातही अशीच खळबळ उडवून देण्याच्या तयारीत आहेत.
- तसेच मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ हा ब्रँड लॉन्च केल्यानंतर इंटरनेट आणि कॉलिंग सुविधा अत्यंत कमी किंमतीत देऊ केली होती. त्यामुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांना बाजारात टिकून राहणं कठीण बनलं होतं. याची सुरुवात अंबानी यांनी दिवाळी सेल पासून केली होती. मोठ्या काळापासून भारतात ई-कॉमर्सच्या बाजारात अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांच्या तुलनेत जिओ मार्टने देखील मोठ्या प्रमाणावर डिस्काऊंट दिले आहेत.
- तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्यावतीनं कन्फेक्शनरी पदार्थांच्या विक्रीवर 50 टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे. याशिवाय रिलायन्स डिजिटलच्या वेबसाईटवर फोनही अत्यंत कमी किंमतीत विकले जात आहेत.
- आत्तापर्यंत केकेआर, सिल्वर लेक सारख्या कंपन्यांकडून मुकेश अंबानी त्यांच्या रिलायन्स रिटेलसाठी 6 अब्ज डॉलरची गुंतवणूक मिळवली आहे. विश्लेषकांच्या माहितीनुसार, येणाऱ्या काही वर्षात भारताच्या ई-कॉर्मर्स मार्केटमध्ये वेगाने विस्तार होईल.
- दरम्यान, टेलिकॉम क्षेत्रापेक्षा रिलायन्सला या क्षेत्रात जरा जास्त अडचणीचा सामना करावा लागणार आहे कारण त्यांची स्पर्धा श्रीमंत अमेरिकी कंपन्या अॅमेझॉन आणि वॉलमार्ट यांच्यासोबत आहे.
- रिटेल क्षेत्रात स्थान निर्माण करताना मुकेश अंबानी यांना सरकारी धोरणांमुळे मोठी आघाडी मिळू शकते. सन 2018 नंतर सरकारने परदेशी गुंतवणुकीबाबत नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्या एक्सक्ल्युझिव्ह प्रॉडक्ट बाजारात आणू शकत नाहीत.
- आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी किंमतींवर जास्त प्रभाव टाकू नये यासाठी हा नियम बनवण्यात आला आहे. या नियमानुसार, स्थानिक सुपरमार्केटच्या साखळीत 51 टक्क्यांपेक्षा जास्त भागीदारी ठेऊ शकत नाहीत. एवढचं नव्हे तर यासारख्या अनेक अटीशर्ती लागू आहेत.
मुंबईतील एमपीएस स्कूल सर्वोत्तम शासकीय शाळांच्या क्रमवारीत :
- देशातील सर्वोत्तम 10 शासकीय शाळांच्या क्रमवारीत मुंबईतील वरळी सीफेस या महापाालिकेच्या शाळेने क्रमांक पटकावला. असे स्थान पटकावणारी राज्यातील व देशातील ती पहिलीच पालिका शाळा ठरली आहे.
- तिरुअनंतपुरम येथील केंद्रीय विद्यालय, नवी दिल्लीतील राजकीय प्रतिभा विकास विद्यालय आणि आयआयटी मद्रासच्या केंद्रीय विद्यालयाने अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे स्थान मिळविले आहे.
- तर वरळी सीफेस एमपीएस शाळेच्या इमारतीप्रमाणेच शाळेमधील विद्यार्थ्यांसाठीच्या भौतिक सुविधा, सहशालेय उपक्रम गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा उंचावणारे असल्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली.
- प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हे यश संपूर्ण शिक्षण विभागाचे असल्याचे त्यांनी म्हटले.
दिनविशेष:
- 12 नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक न्यूमोनिया दिन‘ म्हणून पाळला जातो.
- सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक सेनापती बापट यांचा 12 नोव्हेंबर 1880 मध्ये पारनेर, जि. अहमदनगर येथे जन्म झाला.
- समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव तथा एस.एम. जोशी यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1904 मध्ये झाला.
- सन 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
- सन 2000 मध्ये 12 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.