02 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)


02 November 2020 Current Affairs In Marathi

02 November 2020 Current Affairs In Marathi
02 November 2020 Current Affairs In Marathi
‘वन नेशन, वन गोल्ड’ योजना लागू होण्याची शक्यता:

चालू घडामोडी (2 नोव्हेंबर 2020)

ऑक्टोबरमध्ये जमा झालेल्या वस्तू आणि सेवा कराने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला:

 • करोना संकट असतानाही ऑक्टोबरमध्ये जमा झालेल्या वस्तू आणि सेवा कराने (जीएसटी) गेल्या आठ महिन्यांत प्रथमच एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला.
 • गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमधील ‘जीएसटी’पेक्षा ही वाढ 10 टक्के अधिक आहे.
 • अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये एक लाख पाच हजार 155 कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला असून फेब्रुवारीनंतर प्रथमच एवढा मोठा अर्थदिलासा मिळाला आहे.
 • तसेच 31ऑक्टोबपर्यंत 80 लाख जीएसटीआर-3बी विवरणपत्रे भरण्यात आल्याचेही अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले.
 • ऑक्टोबर 2020 मध्ये जमा झालेल्या एक लाख पाच हजार 155 कोटी रुपयांच्या जीएसटीमध्ये ‘सीजीएसटी’ 19,193कोटी, ‘एसजीएसटी’ 5,411 कोटी, ‘आयजीएसटी’ 52,540कोटी आणि 8,011 कोटी सेसचा समावेश आहे.

‘वन नेशन, वन गोल्ड’ योजना लागू होण्याची शक्यता:

 • संपूर्ण देशात लवकरच ‘वन नेशन, वन गोल्ड’ ही व्यवस्था लागू होण्याची शक्यता आहे. या व्यवस्थेनुसार, देशातील कोणत्याही राज्यात सोन्याचा एकसारखाच भाव असेल.
 • देशभरात ही व्यवस्था आणण्याचा विचार सरकारकडून सुरु आहे.
 • ज्वेलर्स असोसिएशनची मागणी आहे की, सरकारने देशात ‘वन नेशन, वन गोल्ड’ ही व्यवस्था आणावी.यामुळे ग्राहकाला देशभरात सर्व ठिकाणी एकाच किंमतीत सोनं उपलब्ध होईल.
 • सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांची मागणी आहे की, वाढत्या दराने सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे.
 • त्यामुळे एकच किंमत सर्व जागी लागू झाली तर याचा ग्राहकांना मोठा फायदा होईल. ते कुठल्याही राज्यातून सोन खरेदी करु शकतात.

भारताला तीन सुवर्णपदके – अ‍ॅलेक्सिस व्हॅस्टिने बॉक्सिंग स्पर्धा:

 • नँटिस (फ्रान्स) येथे झालेल्या अ‍ॅलेक्सिस व्हॅस्टिने बॉक्सिंग स्पर्धेत जागतिक रौप्यपदकविजेता अमित पंघाल (52 किलो), आशीष कु मार (75 किलो) आणि संजीत (91 किलो) यांनी सुवर्णपदकांची कमाई केली.
 • आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या आणि राष्ट्रकु ल रौप्यपदक विजेत्या अमितने अमेरिकेच्या रेने अब्राहमला 3-0 अशी धूळ चारली.
 • भारतीय खुल्या बॉक्सिंग स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या संजीतने फ्रोन्सच्या सोहेब बौफियाचे आव्हान मोडीत काढले.
 • आशियाई रौप्यपदक विजेत्या आशीषला अमेरिके चा प्रतिस्पर्धी जोसेफ ग्रेरामी हिक्सने दुखापतीमुळे माघार घेतल्याने विजेता ठरवण्यात आले.
 • आशियाई रौप्यपदक विजेत्या कविंदर सिंग बिश्तला 57किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

दिनविशेष:

 • 2 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय आगमन दिन‘ म्हणून पाळला जातो.
 • होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेचे सहसंस्थापक महेन्द्र लाल सरकार यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1833 मध्ये झाला.
 • महाराष्ट्रातील जादुगारांचे आचार्य डॉ.के.बी.लेले यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1882 मध्ये झाला.
 • ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने बीबीसी टेलिव्हिजन सेवा सन 1936 मध्ये सुरू केली.
 • सन 1936 मध्ये कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना झाली.
 • पाकिस्तानातील असेंब्लीने 2 नोव्हेंबर सन 1953 रोजी देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे ठेवले.

 


Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *